Nevasa


नेवासा तालुका (Nevasa Taluka)
नेवासे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. हे शहर प्रवरा नदीच्या काठावर वसलेले आहे. या गावातील करवीरेश्वराच्या देवळात राहून ज्ञानेश्वरांनी इसवी सनाच्या तेराव्या शतकात भावार्थदीपिका हा भगवद्गीतेचे मराठीत निरूपण करणारा ओवीबद्ध ग्रंथ लिहिला. या ग्रंथालाच आपण ज्ञानेश्वरी म्हणतो. ज्या मंदिरातील एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरांनी आपली ज्ञानेश्वरी पहिल्यांदा वाचली तो खांब अजूनही नेवासे गावात आहे असे समजले जाते. याशिवाय, नेवासे येथे मोहिनीराजाचे एक जुने मंदिर आहे. पौराणिक कथांत लिहिल्याप्रमाणे भस्मासुराचा वध करण्यासाठी भगवान विष्णूंनी मोहिनीचे रुप घेतले आणि भस्मासुराचा वध केला. जिथे हा भस्मासुराचा वध झाला ते ठिकाण म्हणजे नेवासे येथील हे मंदिर अशी लोकांची श्रद्धा आहे. हे मंदिर कलात्मकतेचा सुंदर नमुना असून, मंदिर स्थापत्य कलेच्या दृष्टीनेही विशेष महत्त्वाचे आहे.

नेवासा तालुका २००९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीपासून स्वतंत्र विधानसभा मतदारसंघ झाला आहे. यापूर्वी नगर-नेवासा आणि नेवासा-शेवगाव अशा दोन मतदार संघांत तालुका विभागलेला होता. राजकीय दृष्ट्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या राजकीय पक्षांना अनुकूल असलेला हा तालुका असून अलीकडेच भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीचेही बळ वाढतांना दिसत आहे. मारुतराव घुले , यशवंतराव गडाख, वकीलराव लंघे इत्यादी व्यक्तींमुळे तालुक्याची राज्याच्या राजकारणात ओळख टिकून राहिली आहे. सध्या या सर्वांची पुढची पिढी राजकारणात उतरत आहे .
Nevasa Taluka
District Ahmednagar District
State Maharashtra
District Sub-Division Ahmednagar
Headquarters Nevasa
Population 3,26,611(2011)
Education Rate 63.59
Area 1343.43 KM2
Main City/Village Sonai, Shani Shingnapur, Chanda
Tahasildars Smt Hemlata Badhe
Loksabha Constituency Shirdi
MLA Shree Shankarrav Yashvantrav Gadakh
Rainfall 531 mm
Demo

Ahmednagar District

© 2015 nagarcity.in All Rights Reserved. The content is copyrighted to Nilesh Khendke and may not be reproduced on other websites without permission from the owner.